पुणे | छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी पहिल्या समितीच्या अहवालातून मोठ्या प्रमाणात अर्थिक गैरव्यवहार झाला असल्याची माहिती कळतंय.
सारथी संस्थेच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पहिल्या समितीच्या अहवालात ताशेरे ओढण्यात आले आहेत. किशोर राजे निंबाळकर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सचिवांच्या चौकशी समितीमध्ये सारथी समितीच्या कामकाजामध्ये अनियमितता आढळून आल्याचं समोर आलं आहे.
सारथी संस्थेच्या कामकाजात मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक गैरव्यवहार आणि प्रशासकीय अनियमितता आढळून आली. या अनियमिततेचा 5 फेब्रुवारी 2020 ला अहवाल सादर केला होता. यामुळे सारथी संस्थेच्या कामकाजाची पुन्हा सखोल चौकशी करण्यासाठी एक चौकशी समिती नेमण्यात आली होती. समिती दहा दिवसांच्या आत आपला अहवाल सादर करणार असल्याचं कळतंय.
दरम्यान, पुण्यातील सारथी संस्थेच्या कामकाजात गैरव्यहार आणि प्रशासकीय अनियमितता अढळल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. सारथी अंतर्गत विद्यार्थ्यांचे रखडलेले पैसे 15 दिवसांत विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होतील, अशी घोषणा बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांंनी विधान परिषदेत केली.
ट्रेंडिंग बातम्या-
प्रेमविवाह न करण्याची शपथ घेणारी तरूणी झाली प्रियकरासोबत पसार!
भाजप आमदाराकडून पंतप्रधान म्हणून देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख!
महत्वाच्या बातम्या-
चोरट्यांनी चक्क भाजप नगरसेविकेलाच लुटलं!
अहमदनगरच्या आरोपींना मोक्का लावा- तृप्ती देसाई
फी दरवाढ करणाऱ्या इंग्रजी शाळांवर कारवाई होणार का??; बच्चू कडू म्हणाले…
Comments are closed.