Top News

“शरद पवार माझ्या हृदयात तर उद्धव-आदित्यचं बळ माझ्या शरीरात”

मुंबई | राष्ट्रवादी सोडली असली तरी शरद पवार साहेब माझ्या हृदयात असतील तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं बळ अंगात असेल, अशी भावना सचिन अहिर यांनी शिवसेना प्रवेशावेळी व्यक्त केली.

मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत आज (गुरूवार) शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. मी राष्ट्रवादी तोडण्याचं काम कधी करणार नाही. तर शिवसेना वाढवण्याचं काम करेल, असं ते म्हणाले.

शरद पवार यांना गेल्याच आठवड्यात मी भेटलो होतो. माझ्या मतदारसंघाची माहिती त्यावेळी मी त्यांना दिली. मात्र शिवसेना प्रवेशाचा निर्णय मी त्यांना सांगू शकलो नाही, असं अहिर यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र सचिन अहिरांवर जोरदार टीकास्त्र सोडत त्यांना ‘गद्दार’ म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-अहिरांनी राष्ट्रवादी सोडली अन् पक्षाने लगोलग या नेत्याची मुंबई अध्यक्षपदी निवड केली!

-“शरद पवार शिवसेनेत येतील असं वाटत नाही”

-“अहिर जरी सेनेत आले असले तरी वरळीचा पुढचा आमदार मीच…”

ब्राह्मणांमध्येच खास गुण असतात; केरळ हायकोर्टाच्या न्यायाधीशाचा दावा

-…अन् जितेंद्र आव्हाड तोंडावर पडले; ‘ते’ ट्विट केलं डिलीट

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या