बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भगवा घेतलेल्या सचिन अहिरांवर सेनेने सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी!

मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केलेल्या सचिन आहिर यांच्यावर शिवसेनेने महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. सचिन अहिर यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शरद पवार माझ्या हृदयात आहेत. माझा कोणावरही कुठल्याही प्रकारचा राग नाही परंतू आदित्य ठाकरेंसोबत आणि शिवसेनेसोबत काम करण्याची इच्छा असल्याचं सांगत त्यांनी सेनेमध्ये प्रवेश केला होता.

माझे सहकारी सचिन अहिरजी तुमची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! आता फक्त वरळीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी तुम्ही अधिक जोमाने काम कराल असा मला विश्वास आहे, अशा शब्दात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

पाठिंबा आणि विश्वास दाखवल्याबद्दल आभारी आहे, असं म्हणत आदित्य ठाकरेंच्या शुभेच्छांना सचिन अहिर यांनी ट्विटरद्वारे धन्यवाद दिले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

“आम्ही महाराजांचे वंशज आहोत औरंगजेबाचे नाही त्यामुळे औरंगाबादं नाव ‘संभाजीनगर’ झालंच पाहिजे”

रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यात पुन्हा खडाजंगी, पाहा काय आहे प्रकार…

महत्वाच्या बातम्या- 

सरककारने केलेली कर्जमाफी म्हणजे जखम टोंगळ्याला अन् पट्टी मस्तकाला; बच्चू कडूंचा घरचा आहेर

बळीराजाला सुखावणारी बातमी; कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर

घरवापसी केलेल्या जुन्या भिडूवर राज ठाकरेंनी सोपवली नवी जबाबदारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More