Top News

धक्कादायक! दाभोलकरांचा आरोपी सचिन अंदुरेचं फेसबुक अकाऊंट डिलीट

मुंबई | डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी अटक सचिन अंदुरेचं फेसबुक अकाऊंट डिलीट करण्यात आलं आहे. सचिन सध्या सीबीआयच्या ताब्यात आहे. त्यामुळे त्याचं अकाऊंट कुणी डिलीट केलं? हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

सचिनच्या फेसबुक अकाऊंटवर अनेक आक्षेपार्ह पोस्ट होत्या. आज (रविवारी) सकाळपर्यंत त्याचं प्रोफाईल फेसबुकवर दिसत होतं. मात्र दुपारी 12 च्या दरम्यान त्याचं प्रोफाईल दिसेनासं झालं. 

सचिन अंदुरेचं फेसबुक प्रोफाईल कोणी आणि का डिलीट केलं? सचिनच्या पोस्टमुळे कोणाची अडचण वाढणार होती? की फेसबुकने सचिनचं अकाऊंट दिलीट केलं? असे सवाल या निमित्ताचे उपस्थित होत आहेत. 

दरम्यान, सचिनचं अकाऊंट डिलीट करण्यात आलं असलं तरी काहींनी त्यांच्या वॉलवरील स्क्रीन शॉट काढून ठेवले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-धक्कादायक!!! दारू पिण्यापासून रोखलं म्हणून बायकोची जीभच कापली!

-नंदूरबारमध्ये पावसाचं थैमान; तब्बल 400 घरं पाण्याखाली

-…तर पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश वाचल्या असत्या – हमीद दाभोलकर

-… म्हणून हर्षवर्धन जाधव काढणार नवीन राजकीय पक्ष!

-अकोल्यात भाजप आमदाराची जिल्हाधिकाऱ्यांवर दादागिरी

-दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सचिन अंदुरे पोलिसांना कसा सापडला?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या