…म्हणून सचिनला राज्यसभेत पहिलं भाषणही करता आलं नाही

नवी दिल्ली | भारतरत्न, क्रिकेटपटू आणि खासदार सचिन तेंडुलकर याचं राज्यसभेत पहिल्यांदाच भाषण होतं. परंतु त्याच्या भाषणाआधीच विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब ठेवण्यात आलं.

सभागृहात सचिन खासदार म्हणून काय बोलणार होता? कोणते मुद्दे मांडणार होता? याबाबत सभागृहाचे सदस्य आणि त्याच्या चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता होती. पण त्याला त्याचे पहिले भाषण करता आले नाही.

सचिन ‘राईट टू प्ले’बाबत बोलणार होता. तो भाषणासाठी उभा राहिला. बोलण्यास सुरूवात करणार त्याचवेळी विरोधकांनी गदारोळ सुरू केला. तो बराच काळ उभा राहिला. अखेर कामकाज तहकूब करण्यात आले.