महाराष्ट्र मुंबई

“फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोंक्षेंना विधान परिषदेत पाठवू नये”

मुंबई | अभिनेते शरद पोंक्षे यांची विधान परिषदेतील राज्यपाल नामनिर्देशित सदस्य म्हणून महाविकासआघाडीने निवड करू नये, अशी मागणी आरपीआय नेते सचिन खरात यांनी केली आहे.

अस्पृश्यता निवारणासाठी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान श्रेष्ठ आहे, असं वक्तव्य शरद पोंक्षे यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याला विरोध करत करत सचिन खरात यांनी ही मागणी केलीये.

सरकारकडून लवकरच विधान परिषदेतील राज्यपालनियुक्त सदस्यांच्या जागा भरण्यासाठी शिफारस करण्यात येणार आहे. शिवसेनेकडून अभिनेता शरद पोंक्षे यांचं नाव चर्चेत आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या कोट्यातून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी मिळणार असल्याचं जवळपास निश्चित आहे.

महत्वाच्या बातम्या-

…जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार- योगी आदित्यनाथ

“महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत”

‘फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या’

“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”

“…तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या