“मी राजकारणात येईन असा कधी विचारही केला नव्हता”

जयपूर | मी राजकारणात येईन असा कधी विचारही केला नव्हता, असं वक्तव्य राजस्थानच्या उपमुख्यमंत्री पदी निवड झालेले सचिन पायलट यांनी केलं आहे.

वडिलांच्या निधनानंतर 22 वर्षांचा असतानाच मला राजकारणात यावं लागलं आणि 2004 मध्ये 26 वर्षांचा असताना मी लोकसभा निवडणूक जिंकलो, असंही सचिन पायलट यांनी म्हटलं आहे.

2004 साली राहुल गांधी पहिल्यांदाच खासदार म्हणून लोकसभेत आले होते. त्यावेळी माझ्यात आणि राहुल गांधी यांच्यात चांगलीच दोस्ती झाली आणि विविध मुद्दयांवर चर्चा होऊ लागल्या, असंही सचिन पायलट यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, राजस्थान निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाल्यानंतर राजस्थानच्या उपमुख्यमंत्री पदी सचिन पायलट यांची निवड झाली आहे.

महत्वाच्या बातम्या –

-“रामाचं मंदिर रामाच्या जन्मस्थानी नाही होणार, मग कुढल्या स्थानी होणार?”

-नितेश राणे-रामदास कदम वाद चिघळला; नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट

-अमित शहांना दुर्बिण भेट देणार – कपिल सिब्बल

-“… तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आज भाजपमध्ये असते”

-68 लाख युजर्सचे वैयक्तिक फोटो सार्वजनिक; फेसबुकनं मागितली माफी