Top News देश राजकारण

अखेर सचिन पायलट यांचं विमान काँग्रेसच्या धावपट्टीवर लँड!

राजस्थान | राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची घरवापसी होणं जवळपास निश्चित झालं आहे. राजस्थान सरकारमध्ये भूकंप घडवत त्यांना धक्का देऊन बंडाचा झेंडा उभा करणारे सचिन पायलट काँग्रेसमध्येच राहणार आहेत. काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सचिन पायलट यांनी काँग्रेस पक्ष आणि सरकारला साथ देणार असल्याचंही म्हटलं आहे. काँग्रेस पक्षातर्फे सचिन पायलट यांचं बंड शमल्याचं जाहीर करण्यात आलंय. सोमवारी सचिन पायलट यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती.

राजस्थानात सचिन पायलट हे राजकीय भूकंप घडवतील असं वाटत होतं. मात्र राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी केलेली शिष्टाई यशस्वी ठरलीये. महिनाभराहून अधिक काळ सचिन पायलट यांनी राजस्थानमधील राजकीय वातावरण अस्थिर ठेवलं होतं. मात्र अखेर बंडाचं झेंडा उगारत पक्षाला राम राम करणाऱ्या सचिन पायलट यांची घरवापसी झालीये.

गेल्या महिनाभरापासून अधिक काळ हरयाणात डेरा टाकून बसलेले आमदार आता जयपूरला परतण्याच्या तयारीत आहेत. अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्री केल्याने आणि सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री केलं गेल्याने सचिन पायलट चांगलेच नाराज झाले होते. मात्र काँग्रेसला राजस्थानचा गड राखण्यात यश आलंय कारण सचिन पायलट हे काँग्रेसमध्ये परतले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

विद्यार्थ्यांना फी साठी सक्ती केली तर गाठ आमच्याशी आहे- बच्चू कडू

भाजपच्या किरीट सोमय्या यांना कोरोनाची लागण

चहा पिताना एकमेकांकडे पाहणं पडलं महागात, तिघांनी तरूणावर कोयत्याने केले वार

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीत…., ग्रामविकास मंत्र्यांची महत्त्वाची घोषणा

आज ६७११ रूग्ण बरे होऊन घरी, तर राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९ टक्क्यांवर- राजेश टोपे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या