देश

हाफ चड्डी घालून भाषणं करणं हा राष्ट्रवाद नव्हे तर…- सचिन पायलट

जयपूर | कृषी कायद्यांविरोधात गेल्या 40 दिवसांपासून शेतकरी संघटना दिल्लीच्या वेशीवर ठाण मांडून बसल्या आहेत. आतापर्यंत केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये सहावेळा चर्चा झाली. मात्र या सर्व बैठका निष्फळ ठरल्या आहेत. यावरून काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि केंद्र सरकार निशाणा साधलाय.

हाफ चड्डी घालून खोटी भाषणं देण्याला राष्ट्रवाद म्हणत नाहीत. तर शेतकऱ्यांच्या हिताविषयी बोलणं हा खरा राष्ट्रवाद आहे, असं सचिन पायलट यांनी म्हटलंय.

तुम्ही लव्ह जिहादसाठी कायदे बनवत आहात. तुम्हाला लग्नासारख्या गोष्टींवर चर्चा करायला वेळ आहे. मात्र, तुमच्याकडे शेतकऱ्यांसाठी वेळ नाही. हा म्हणजे शेतकऱ्यांचे भवितव्य अंधारात लोटण्याचा प्रकार आहे, अशी टीका सचिन पायलट यांनी केली आहे.

दरम्यान, शेतकरी संघटना या कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. मात्र केंद्र सरकारही मागे हटण्यास तयार नाही.

थोडक्यात बातम्या-

“महाराष्ट्राला एक नवा पत्रमहर्षी लाभला आहे”

माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचं निधन

“आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच कोरोनाची लस टोचवून घ्यावी”

“चंद्रकांतदादांचं पत्रलेखन म्हणजे उकळत्या किटलीतील रटरटता चहा”

क्रूरतेचा कळस! सांगवीत पोत्यामध्ये घालून भटक्या कुत्र्याला पेटवून दिलं…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या