Top News राजकारण

“अमर, अकबर, अँथनी’ हिट!; रॉबर्ट सेठ हरला”

पुणे | राज्यातील पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीत भाजपाला चांगलाच पराभव सहन करावा लागलाय. यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपला टोला लगावला आहे.

या निवडणूकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश मिळालंय. यावेळी बोलताना सचिन सावंत म्हणाले, “अमर, अकबर, अँथनी’ या चित्रपटाप्रमाणे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षाचं कॉम्बिनेशन हिट झालंय.”

लोकशाही समोर भाजपच्या रूपाने एक मोठं संकट उभं ठाकलंय. यासाठीच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आलेत. देशाच्या हितासाठी आता भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणं गरजेचं असल्याचंही, सावंत यांनी सांगितलंय.

भाजपच्या ताब्यात असलेला नागपूर पदवीधर मतदारसंघही हातातून गेलाय. विदर्भातील आपला गड देवेंद्र फडणवीसांना सांभाळता आला नाहीये आणि त्यांना महाराष्ट्राच्या सत्तेची स्वप्ने त्यांना पडतायत, असा टोलाही सावंत यांनी लगावलाय.

महत्वाच्या बातम्या-

“जेवढा त्रास पवारसाहेबांना द्याल, दुप्पट जनता तुम्हाला देईल”

राज ठाकरेंनाही डिसले गुरुजींचा अभिमान, अशा शब्दात केलं कौतुक!

भारताला मोठा धक्का; हा स्टार खेळाडू झाला दुखापतग्रस्त!

अखेर मोदी सरकार नमलं; शेतकऱ्यांना दिली ‘ही’ परवानगी!

निलेश राणेंचं आक्षेपार्ह ट्विट; महाविकास आघाडीतील पक्षांना दिली ‘ही’ शिवी!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या