फडणवीस साहेब फार मोठे नेते आहेत, मी त्यांच्यापुढे छोटा आहे- सचिन सावंत
मुंबई | फोन टॅपिंगवरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. फोन टॅपिंगच्या माध्यमातून राज्यातील काही नेते, पोलीस अधिकारी आणि इतर व्यक्तींची संभाषण रेकॉर्ड करण्यात आले होते. या सगळ्याची माहिती फडणवीस यांच्या हाती लागली. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपने केलीये
याप्रकरणावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपवर आरोप केले होते. याबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देत देेवेंद्र फडणवीसांनी सचिन सावतांना टोला लगावला.
सचिन सावंतांना मी काय उत्तर देणार. त्यांना काही समजते तरी का? त्यांना उत्तर द्यायला आमचे राम कदम आहेत. ते रोज काहीही बोलत असतात. दररोज रोज काहीही बोलणाऱ्यांना मी थोडीच उत्तर देणार, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता. आता फडणवीसांच्या या टीकेला सावंतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
आदरणीय फडणवीस साहेब फार मोठे नेते आहेत, मी त्यांच्यापुढे छोटा आहे. मात्र, माझी विश्वासार्हता ही फडणवीस यांच्यापेक्षा कांकणभर जास्त आहे, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.
आदरणीय फडणवीस साहेब फार मोठे नेते आहेत. मी त्यांच्यापुढे छोटा आहे.
मात्र….
माझी विश्वासार्हता ही फडणवीस साहेबांपेक्षा कांकणभर जास्त आहे. 😊— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 27, 2021
थोडक्यात बातम्या-
गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावं, ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणं हे बरं नाही- संजय राऊत
“…म्हणून शरद पवारांनी अनिल देशमुखांकडे गृहमंत्रीपद सोपवलं”
‘आपल्या संसाराला काळतोंड्याची नजर लागली’; दिपाली यांचं पतीला लिहिलेलं भावनिक पत्र व्हायरल
जीवाभावाच्या मित्राची दगडाने ठेचून केली हत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
…तर आम्ही रश्मी शुक्ला यांच्यासोबत आहोत- प्रणिती शिंदे
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.