बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोल्हापूर आणि सांगलीबाबत काँग्रेसनं केली ही मोठी मागणी

मुंबई | अत्यंत गंभीर L3 दर्जाची आपत्ती घोषित करा, अशी मागणी करणारं पत्र काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलं आहे.

राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या मार्गदर्शन नियमावलीनुसार अत्यंत गंभीर स्वरूपाची L3 दर्जाची आपत्ती घोषित करण्यात यावी, अशी मागणी ,पत्रातून करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट करून यासंदर्भातली माहिती दिली.

राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांचीही आपत्ती निवारणाची जबाबदारी असते. परंतू केंद्र सरकारकडून सांगली- कोल्हापूर भागातल्या पूरग्रस्तांसाठी ठोस मदत केली गेलेली नाही, त्यामुळे काँग्रेसकडून मुख्यमंत्र्यांना हे पत्र देण्यात आलं आहे.

दरम्यान, काँग्रेसचे नेते रणजीत देशमुख यांनीही आगामी विधानसभा निवडणूका वर्षभरासाठी पुढे ढकलून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केली आहे.

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचं ट्वीट-

महत्वाच्या बातम्या-

-‘शाहू’नगरीतला मुस्लिम समाज बकरी न कापता देणार पूरग्रस्तांना आर्थिक मदत!

-“जनतेला कोरडी सहानुभूती दाखवायची नव्हती, म्हणून मी पूरग्रस्त भागात गेलो नाही”

-कोण काय करतो आम्हाला माहित नाही…. आमची लोकं काम करतात- उद्धव ठाकरे

-“राष्ट्रीय आपत्तीच्या शब्दात अडकण्याची मला आवश्यकता वाटत नाही”

-महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; काँग्रेसच्या ‘या’ माजी मंत्र्याची मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More