बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मोदी सरकारच्या नियोजन शून्य कारभारामुळे 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील लसीकरण होणार नाही हे दुर्दैव”

मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केंद्राने लसीकरणावर भर देण्याचा निर्णय घेतला. त्यासोबतच 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील सर्वांना लस देण्याच्या सूचना दिल्या. मात्र राज्यांना लसीचा तुटवडा असल्याच्या तक्रारी अनेकदा आल्या. या अपुऱ्या लसीमुळे महाराष्ट्र राज्यात 1 मे पासून लसीकरण होणार नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला.

भारतात कोरोनामुळे मृत्यूचा तांडव चालला असताना ही मोदी सरकारची बेफिकिरी अपराधी प्रवृत्तीची आहे.  शिवराज सिंह चौहान यांनीही मध्यप्रदेशात लशींअभावी 1 मेला लसीकरण सुरू होणार नाही असं स्पष्ट केलं. लशींचा साठा उपलब्ध नसल्याने देशस्तरावर एवढा मोठा कार्यक्रम ढेपाळण्यासाठी मोदी सरकार जबाबदार असल्याचं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

1 मे पासून 18 ते 44 या वयोगटातील देशाच्या तरुण कार्यशक्तीचे लसीकरण केंद्र सरकारने जाहीर केलं. परंतु अत्यंत ढिसाळ आणि नियोजन शून्य मोदी सरकारने लशींचा पुरवठा न केल्याने हा कार्यक्रम देशपातळीवर सुरू होऊ शकणार नाही हे दुर्दैव आहे, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

दरम्यान,ही दिरंगाई केवळ 18-44 वयोगटात नाही. 45 वर्षांवरील वयोगटातील लसीकरणही केंद्राने लशींचा पुरवठा नीट न केल्याने सातत्याने अडचणीत येत आहे. महाराष्ट्राला जाहीर केलेल्या 435000 रेमडेसीवीरपैकी केवळ 2,30,000 इंजेक्शन पाठवले आहेत. मोदी सरकार दिलेले शब्द पाळत नसेल तर राज्यांनी नियोजन कसे करावं, असा सवालही सावंत यांनी केला आहे.

 

 

 

थोडक्याता बातम्या- 

“सरकारला स्वत: ची चुक कळली”; राज ठाकरेंची ती मागणी मुख्यमंत्र्यांनी केली मान्य

कोरोना व्हायरसबाबत लोकांना जागरुक करण्यासाठी पोलिसांनी धरला ठेका, पाहा व्हिडीओ

पुणे हादरलं! आई-वडिल मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर 19 वर्षीय तरूणीवर घरात घुसून बलात्कार

‘परिस्थिती गंभीर होत चाललीये, आतातरी काहीतरी करा’; 100 शास्त्रज्ञांचं मोदींना पत्र

कोरोना झाला असतानाही रोहित सरदाना करत होते ‘ही’ महत्त्वाची मदत, शेवटचे तीन ट्विट चर्चेत!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More