महाराष्ट्र मुंबई

“अजित पवारांनी भाजपला व फडणवीस साहेबांना ‘मामु’ बनवलं”

Loading...

मुंबई | शिवसेनेनं विधानसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावांनी लढवली. काँग्रेस-राष्ट्रवादीने युतीच्या विरोधात निवडणूक लढवली. तुम्हाला अजित पवारांना काही प्रश्न विचारायचे असेल तर त्यांनाच विचारा… म्हणून देवेंद्र फडणवीस म्हणतात पुन्हा विधानसभा निवडणुका घ्या, असं म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सचिन सावंत यांच्यावर टीका केली होती. यावर सचिन सावंतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

किरीट सोमय्या जी, तुम्ही काय लिहिले आहे व त्याचा अर्थ काय? हे तुम्हालाच ठाऊक! पण अजित पवारांनी भाजपला व फडणवीस साहेबांना “मामु” बनवले हे मात्र निश्चित! “मामु म्हणजे माजी मुख्यमंत्री” बरं! तुमच्या मनातील दुसरा अर्थ माझ्या मनात नाही, असं म्हणत सावंतांनी टोला लगावला आहे.

तुमच्यात हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक लावा, जनतेच्या कोर्टात फैसला होऊन जाऊ द्या, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती. यावर आघाडीच्या नेत्यांनी फडणवीसांना सुनावलं होतं.

अंधारात कारस्थानाने शपथ घेणारे फडणवीस सत्तेच्या हव्यासापोटी आंधळे झाले आहेत. त्यामुळेच ते पुन्हा निवडणुका घेण्यास सांगत आहेत, असं म्हणत सचिन सावंतानी टीका केली होती.

Loading...


ट्रेंडिंग बातम्या-

विठूमाऊली हा खरा संघर्ष करायला मला ताकद द्या- तृप्ती देसाई

चंद्रकांत पाटील म्हणतात, इंदुरीकर महाराजांनी केलेलं वक्तव्य चुकीचं, पण…

महत्वाच्या बातम्या- 

“पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे वागणार नाही ना… मला काही सांगायचं आहे”

सध्या माझे वाईट दिवस सुरु आहेत- इंदुरीकर महाराज

मुंबईत जीएसटी भवनाला भीषण आग; अग्निशमनच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या