Top News

“ईडीची नोटीस आल्यानेच राज ठाकरेंनी भूमिका बदलली”

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी 23 जानेवारीला पक्षाचे पहिले महाअधिवेशन घेतले. यावेळी त्यांनी आपली बदलती भूमिका जनतेसमोर मांडली. तसेच त्यांनी भाजपसोबत जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. यावरुन काँग्रेसने राज यांच्यावर टीका केली आहे.

ईडीची नोटीस आल्यानेच राज ठाकरे यांनी आपली भूमिका बदलली, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. राज ठाकरे यांनी गेल्या 14 वर्षात अनेकदा सोयीनुसार आपली भूमिका बदलली आहे, असं ते म्हणाले आहेत.

राज ठाकरे यांनी 2008 साली मराठीचा मुद्दा उपस्थित करत राजकारण सुरु केले. त्यानंतर 2013 साली त्यांनी गुजरात दौरा केला आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रेमात पडले. त्यानंतर 2016 साली त्यांनी मोदींना विरोध करणं सुरु केले. आता परत ते मोदींची स्तुती करतील, असं म्हणत सावंत यांनी टीका केली आहे.

सावंत यांनी विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्यासही विरोध केला. भाजप केवळ लोकांना दाखवण्यासाठी सावरकर प्रेम करत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

महत्वाच्या बातम्या-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या