बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोमय्यांच्या ‘त्या’ संतापावर सचिन सावंत म्हणतात, दुखत्या नसेवर बोट ठेवल्यास…

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या हे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर व मंत्र्यांवर गंभीर आरोप करत असल्याने चांगलेच चर्चेत आले आहे. तसेच किरीट सोमय्या यांच्यावरही महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठली आहे. अशातच सोमय्या यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून पोस्टरबाजीही करण्यात आली.

आघाडी सरकारच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या पोस्टरबाजीमधून किरीट सोमय्या हे भाजप नेत्यांच्या चौकशी बद्दल का बोलत नाहीत, असा प्रश्नही विचारला होता. त्यातच काल पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये किरीट सोमय्या यांना तुम्ही आरोप करत असलेली लोक जर उद्या भाजपमध्ये आले तर तुमची भूमिका काय असेल? असा प्रश्न विचारला असता त्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला.

किरीट सोमय्या यांनी संत पॉल कुठेही असेल तरी चौकशी व्हायला हवी असं उत्तर दिलं. यावरूनच काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत दुखत्या नसेवर बोट ठेवल्यावर किरीट सोमय्याजी संतापणार नाही तर काय?, असं म्हणत किरीट सोमय्यांवर टीकेची तोफ डागली.

सचिन सावंत यांनी मुखवटा हलल्यावर खरा चेहरा लपवण्याचा प्रयत्न होणारच, अशी टीका करत नौटंकी ही शेवटी नौटंकीच असते, असं किरीट सोमय्या यांना उद्देशून म्हटलं आहे. त्यामुळे आता सध्या महाविकास आघाडीचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर टीकेची एकही संधी सोडताना पाहायला मिळत नाही.

 

थोडक्यात बातम्या-

“एनसीबीची आणखी एक पोलखोल”; नवाब मलिक आज घेणार पत्रकार परिषद

“पाहुण्यांनी घरात किती दिवस मुक्काम करावा याला काही मर्यादा असतात”

महाराष्ट्र पोलिसांचा विदेशात डंका! एपीआय सुभाष पुजारींनी पटकावलं कांस्य पदक

कोरबो लोरबो जितबो रे! रोमांचक विजयासह कोलकाताची फायनलमध्ये एन्ट्री

“भाजपमध्ये गेल्यापासून मला शांतपणे झोप लागते, कसलीही चौकशी नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More