बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“साम दाम दंड भेद या सगळ्याचा वापर करून सरकारं पाडायची, हाच भाजपचा उद्योग”

मुंबई | परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. यावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. साम दाम दंड भेद या सगळ्याचा वापर करून सरकारं पाडायची, हाच भाजपचा उद्योग आहे, असं म्हणत सचिन सावंतांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

पोलीस दलातील अधिकाऱ्यानं पत्र लिहून खदखद व्यक्त केल्याची घटना देशात पहिल्यांदा घडलेली नाही. 2002 मध्ये डी. जी. वंजारा गुजरात पोलीस दलाचे प्रमुख होते. गृहमंत्री अमित शहा पोलीस दलाचा गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यावेळी शहांनी राजीनामा दिला होता का?, असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे.

वंजारा यांच्यासारखेच आरोप पोलीस अधिकारी संजीव भट यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवर केले होते. त्यावेळी मोदींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता का?, असं म्हणत सचिन सावंत यांनी भाजप नेत्यांना फटकारलं आहे.

दरम्यान, भाजपचं षडयंत्र स्क्रिप्टेड असतं. पोलीस आयुक्त पदावरून दूर झालेले परमबीर सिंह पत्र लिहिणार याची भाजप नेत्यांना कल्पना होती. त्यांना सगळं आधीपासूनच माहीत होतं. त्यामुळेच तर पत्र बाहेर येताच फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली, असं सचिन सावंत यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

सचिन वाझेंना पुन्हा पोलीस दलात घेण्याचा निर्णय कोणाचा? शरद पवारांचा गौप्यस्फोट

‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे’, मित्राला वाचवण्यासाठी दाखवली जबरदस्त हिंमत, पाहा व्हिडिओ

अनिल देशमुखांवर झालेल्या गंभीर आरोपांवर बाळासाहेब थोरातांनी सोडलं मौन, म्हणतात…

‘ये तो सोची समझी चाल’; ठाकरे सरकारमधील मंत्र्याची भाजपवर टीका

कुंपणच शेत खात असेल तर राज्यातील जनतेने कुठे न्याय मागायचा?- चित्रा वाघ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More