बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“रश्मी शुक्ला यांनी पेन ड्राईव्ह दिला नव्हता तर, फडणवीस कोणत्या पेन ड्राईव्ह बद्दल बोलत होते?”

मुंबई | पुण्याच्या माजी आयुक्त आणि आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंग प्रकरणी राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केला आहे. या अहवालावरून रश्मी शुक्ला यांनी अनधिकृत पद्धतीने फोन टॅप केले होते हे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर भाजप आणि रश्मी शुक्ला वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

रश्मी शुक्ला यांनी कोणताही पेन ड्राईव्ह दिला नव्हता. मुख्य सचिवांच्या अहवालात हे सर्व सत्य समोर आले आहे. फडणवीस असत्य बोलले बोलले आहेत. फडणवीस यांनी देशभरात महाराष्ट्राची बदनामी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी केंद्रीय गृह सचिवांना असत्य माहिती दिली आहे. आम्ही याचा जाहीर निषेध करतो, असं सचिन सावंत म्हणाले आहेत.

रश्मी शुक्ला यांनी ज्यासाठी फोन टॅपिंगची परवानगी मागितली होती आणि त्यानंतर त्यांनी जो अहवाल सादर केला आहे, यात निश्चितप्रकारे विरोधाभास आहे. जर रश्मी शुक्ला यांनी पेन ड्राईव्ह दिला नव्हता तर, फडणवीस कोणत्या पेन ड्राईव्ह बद्दल बोलत होते? याचा अर्थ ते जनतेशी खोटं बोलत होते. जर खरचं रश्मी शुक्ला यांनी फडणवीस यांना पेन ड्राईव्ह दिला असेल तर, फडणवीस एका अपराध्याला पाठीशी घालत आहेत, असा आरोप सावंत यांनी केला आहे.

दरम्यान, फडणवीस यांनी सभागृहात सीडीआरमुळे गोंधळ घातला होता, तो सीडीआर त्यांना कुठून मिळाला? हा गुन्हा आहे. त्याचबरोबर अपराध्याला पाठिशी घालण्याचं काम भाजप करत आहे. भाजपच्या अशा वागण्यामुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे. त्यामुळेच भाजपसारखा बेजबाबदार पक्ष महाराष्ट्राला लाभला आहे. त्याचं हे कुटील राजकारण, राजकारणाला खालच्या स्तरावर नेत आहे, असं सावंत म्हणाले.

पाहा व्हिडीओ – 

 

Shree

थोडक्यात बातम्या- 

पोलीस दलाला जनतेच्या मनातून उतरवणाऱ्यांची गय करणार नाही- अजित पवार

“रश्मी शुक्ला भाजपच्या एजंट म्हणून काम करत होत्या”

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

राज्याच्या मुख्य सचिवांचा फोन टॅपिंग प्रकरणावरील अहवाल सादर, रश्मी शुक्लांवर कारवाई होणार???

जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More