Top News मनोरंजन राजकारण

एनसीबीने ड्रग प्रकरणी कंगणाची चौकशी करावी- सचिन सावंत

मुंबई | अनेक मुद्द्यांवरून सध्या बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत चर्चेत आहे. एका व्हिडीयोमध्ये कंगणाने खुद्द आपण ड्रग्ज घेत असल्याचं सांगितलं. यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसने तिच्यावर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी, नार्कोटिक्स विभागाने कंगनाची ड्रग्ज संदर्भात चौकशी केली पाहिजे, म्हटलंय. शिवाय भाजप आमदार राम कदम यांच्यावर कारवाईचीही मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.

सचिन सावंत म्हणतात, “कंगणा राणावत सारख्या व्यक्तीची तुलना भाजपाचे आमदार राम कदम यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याशी केली. इतिहासात झाशीच्या राणीचा घोर अपमान करण्याची कोणी हिंमत दाखवली नाही. यासाठी भाजपाने देशाच्या जनतेची माफी मागितली पाहिजे. कंगनाची पाठराखण करणाऱ्या आमदार राम कदम यांच्यावर भाजपाने कारवाईही केलेली नाही. त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं सांगत जबाबदारी झटकण्याचं काम केलंय.”

“कंगणाचे बोलवते धनी भाजपा नेते आहेत, हे या सर्व गोष्टींमधून स्पष्ट होतंय. मुंबईचा आणि महाराष्ट्राचा कंगणाने केलेला अपमान भाजपाच्या इशाऱ्यावर होता,” अशी टीकाही सावंत यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

करणी सेनेचा कंगणा राणावतला पाठिंबा; कंगणाच्या सुरक्षेसाठी सदस्य विमानतळावर उपस्थित राहणार

‘…तर एकाही अधिकाऱ्याला गाडीत फिरून देणार नाही’; रूपाली पाटलांचा इशारा

“कंगणासारखे उपरे आणि जॅकलीन फर्नांडीस, दिशा पटानी अस्सल मराठी, बरोबर ना?”

कंगणा राणावतला होम क्वारंटाईन करणार- किशोरी पेडणेकर

…अशा लोकांना महाराष्ट्रात राहण्याचा हक्क नाही- अबू आझमी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या