मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी बुधवारी सकाळी त्यांच्या राहत्या घरातून अटक केली. यावर महाराष्ट्र प्रदेश cकाँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी पोलिसांनी केलेली कारवाई योग्य असल्याचं म्हटलंय.
सचिन सावंत म्हणाले, “अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी अर्णब गोस्वामींवर पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच आहे. शिवाय या कारवाईचा पत्रकारितेशी संबंध लावणं चुकीचे आहे. 2 वर्ष या प्रकरणात देवेंद्र फडणवीस सरकारने कारवाई न करता अन्वय नाईक कुटुंबावर अन्याय केला.”
सावंत पुढे म्हणाले, “मात्र आता जर महाविकास आघाडी सरकार नाईक कुटुंबियांना न्याय मिळवून देत असेल तर ही कारवाई योग्य आहे. कोणाच्या दबावाखाली धमकावून हे प्रकरण दाबलं गेलं त्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई देखील केली पाहिजे.”
नाईक यांच्या सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी आणि इतर दोघांची नावं आहेत. असं असूनही यापूर्वीच्या सरकारने यासंदर्भात कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केलाय.
महत्त्वाच्या बातम्या
“…म्हणून शांत बसलोय, वर्दी उतरव आणि ये”; पाहा कुणी दिलं पोलिसाला चॅलेंज
अर्णब गोस्वामींची सुटका की कोठडीत रवानगी???; पाहा न्यायालयानं दिलेला निर्णय
‘राजीनामा देण्यासाठी भाजपने 5 कोटी रुपये दिले होते’; ‘या’ माजी आमदाराचं वक्तव्य
अमिताभ बच्चन आणि ‘सोनी’ विरोधात भाजप आमदाराची पोलिसांत धाव!
“सोनिया गांधींच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध”