पुणे | राष्ट्रवादीचे काँग्रेसचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचं आज निधन झालंय. भारत भालके यांच्या निधनानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.
दरम्यान काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भालके यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केलाय. ट्विटरच्या माध्यमातून सावंत यांनी भालके यांना श्रद्धांजली वाहिलीये.
सचिन सावंत म्हणतात, “आमदार भारत भालके यांचे निधन अत्यंत दुःखदायक व अविश्वसनीय आहे. काँग्रेस पक्षात असताना त्यांचा अनेकदा संपर्क यायचा. आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांची धडपड व कारखान्याच्या करिता चिंता मी पाहिली आहे. एक चांगला नेता महाराष्ट्राने गमावला. भावपूर्ण श्रद्धांजली”
गेल्या काही दिवसांपासून भारत भालके प्रकृती बिघडल्याने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरु होते. मात्र उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
महत्वाच्या बातम्या-
‘ती’ व्यक्ती मला माहीत होती; लता मंगेशकर यांचा अत्यंत धक्कादायक आरोप
चंद्रकांत पाटलांचा जन्म राजकारणासाठी नव्हे तर…- हसन मुश्रीफ
“मुलगी होईल या भीतीने नितीश कुमार यांनी दुसरं मूल जन्माला घातलं नाही”
100 देशांच्या राजदूतांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची सीरम इन्स्टिट्यूट भेट रद्द!
“महाराष्ट्राला कर्तबगार मुख्यमंत्री हवाय, ड्रायव्हर नकोय”