सरकार नाचतंय, प्रशासन नाचतंय… मग आम्हालाही बोलवा!

मुंबई | नदी बचाव योजनेच्या व्हिडिओवरुन मुख्यमंत्री ट्रोल झाल्यानंतर आता विरोधकांनीही त्यांच्यावर निशाणा साधलाय. सरकार नाचतंय, प्रशासन नाचतंय मग आम्हालाही बोलवा, असा टोला काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी लगावलाय. 

हा एक व्यावसायिक व्हिडिओ असून ज्यामध्ये मुख्यमंत्री आणि प्रशासकीय अधिकारी ताल धरताना दिसत आहेत, असे व्हिडिओ काढून जर राज्याचे प्रश्न सुटणार असतील तर विरोधी पक्षांनाही बोलवा. त्यांना का बाजूला ठेवता?, असा सवाल त्यांनी विचारलाय. 

दरम्यान, या व्हिडिओवरुन सोशल मीडियात मुख्यमंत्री जोरदार ट्रोल होत आहेत.