मनसे अर्ध्या हळकुंडाने पिवळी, बिस्लेरीचा निर्णय आधीचाच!

मुंबई | मनसे ही अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली संघटना आहे. बिस्लेरीच्या बाटल्यावर मराठीत नाव छापणे हा मनसेच्या आंदोलनाचा परिणाम नसून ऑगस्टमध्येच तो निर्णय झाला होता, असं टीकास्त्र काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी सोडलंय. 

बिस्लेरीने आपल्या उत्पादनांवर मराठी भाषेत नाव छापण्याचा निर्णय घेतलाय. त्यावरुन मनसे आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षात श्रेयवादाची लढाई रंगलीय. त्यासाठी दोन्ही पक्ष बिस्लेरीला पाठवलेल्या पत्राचे दाखले देत आहे. 

दरम्यान, ‘थोडक्यात’ने हा निर्णय ऑगस्टमध्ये झाल्याचं कालच सांगितलं होतं. तसेच या निर्णयाच्या छापून आलेल्या लेखाची लिंकही दिली होती. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या