Top News राजकारण

“कोरोनामुळे संसदेचे अधिवेशन रद्द करणाऱ्या मोदींना कितवं आश्चर्य म्हणणार?”

मुंबई | राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी दोन दिवसांचा ठेवल्यावरून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ठाकरे सरकारविरोधात बोंब ठोकत महाविकास आघाडी सरकारला आठवं आश्चर्य असं म्हटलं होतं. याच मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधलाय.

अधिवेशनाच्या कालावधीवरून महाविकास आघाडी सरकारला हिणवणारा भाजपा हा जगातील सर्वात दांभिक आणि ढोंगी पक्ष आहे. 2 दिवसांच्या अधिवेशनावर टीका करणारे हे भाजपा नेते आता कोरोनामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशनच रद्द करण्यात आलं त्यावर मोदींना कितवं आश्चर्य म्हणणार? असा संतप्त सवाल सचिन सावंत यांनी केलाय.

सचिन सावंत म्हणाले की, “कोरोनाच्या संकटामुळे राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन दोन दिवसांचं घेण्यात येत असल्याने विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने आकांडतांडव केलं. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने दोन दिवसांचे का होईना अधिवेशन घेतलं पण केंद्रातील भाजपाच्या सरकारने तर चक्क अधिवेशनच रद्द केलं याला काय म्हणायचं? मोदी सरकार चर्चेपासून पळालं असं म्हणायचे का? ”

ते पुढे म्हणाले, “सर्व अनलॉक करताना कोरोनाचा धोका होत नाही आणि मंदिर उघडल्यासच कोरोनाचा धोका कसा काय वाढतो? असे प्रश्न विचारत भाजपाने राज्यात आंदोलनाच्या माध्यमातूनही गोंधळ घातला होता. आता हे ढोंगी लोक त्यांचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदींना असे प्रश्न विचारण्याची हिम्मत दाखवतील का?”

थोडक्यात बातम्या-

‘या’ तारखेपासून सर्वसामान्यांसाठी सुरु होणार लोकल सेवा; विजय वडेट्टीवारांनी दिले संकेत

सर्वसामान्यांच्या खिशाला फटका; घरगुती गॅस सिलेंडर पुन्हा महागला

आईची शपथ घेऊन सांगतो; भर सभागृहात मुनगंटीवारांना का घ्यावी लागली शपथ???

ऐकमेकांची डोकी फोडायचीत तर फोडा, पण विज बिलाचं आश्वासनं पूर्ण करा- देवेंद्र फडणवीस

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या