Top News महाराष्ट्र मुंबई

‘मी ड्रग्जच्या आहारी गेले होते’; डीअर एनसीबी, कंगणाला चौकशीसाठी कधी बोलवणार?

मुंबई | बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंहच्या मृत्युनंतर ड्रग्जचा मुद्दा चर्चेत आला. त्यावेळी अभिनेत्री कंगणा राणावतने ड्रग्जवरून बॉलिवूडमधील काही कलाकारांवर थेट आरोप केले होते. अशातच कंगणाचा एक व्हिडीओ काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत याबाबत एनसीबीला सवाल केला आहे.

डीअर एनसीबी, ती परत आलीये. या व्हिडीओच्या चौकशीसाठी तुम्ही कंगणाला कधी चौकशीसाठी बोलवणार आहात?, असं सचिन सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. कंगणा मुंबईमध्ये दाखल झाली आहे.

कंगणाला बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटची माहिती द्यायची असल्यानं मोदी सरकारने तिला वाय श्रेणीची सुरक्षा दिली आहे. मात्र ती अजूनही माहिती लपवत आहे, जो की गुन्हा असल्याचं सावंतांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सावंत यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये कंगणाने आपण ड्रग्जच्या आहारी गेल्याची कबुली दिली आहे. यावर एनसीबी काय भूमिका घेतंय?, आणि यावर कंगणा काय प्रतिक्रिया देते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या- 

‘शिवसेना-राष्ट्रवादी मिळून आपल्याविरुद्ध रणनीती आखताहेत’; काँग्रेस नेत्याचं सोनिया गांधींना पत्र

पुण्यात आता हेच बघायचं बाकी राहिलं होतं; रानगव्यांनंतर दिसला हरणांचा कळप!

‘पुराव्यानिशी आरोप सिद्ध करा, नाहीतर…’; संजय राऊत आक्रमक

राहुल गांधी गर्भश्रीमंत, मी शेतकऱ्याच्या घरात जन्मलोय- राजनाथ सिंह

राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या हत्येची सुपारी; पुण्यात खळबळ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या