देश

महाराष्ट्र-बिहार तुलना करणाऱ्या सुशील कुमार मोदींना सचिन सावंतांनी झापलं

मुंबई |   कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावरून बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदींनी महाराष्ट्र सरकारला लक्ष्य केलं होतं तसंच कोरोना रूग्णांच्या संख्येवरून बिहार-महाराष्ट्र तुलना केली होती. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत सुशील कुमार मोदी यांच्या टीकेला जशास तसं उत्तर दिलं आहे.

सुशील कुमार मोदीजी, जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असते तर महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या बिहार राज्यापेक्षा देखील कमी असती, असा टोला लगावत खोटं बोलण्यात फडणवीस तुमच्याही पेक्षा अधिक पुढे आहेत, अशा शब्दात सचिन सावंत यांनी बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

सुशील कुमार मोदी यांनी मुंबईच्या पावसावरूनही तसंच तुंबलेल्या पाण्यावरूनही ठाकरे सरकारवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला देखील सावंतांनी प्रत्युत्तर दिलं आहे, सावंत म्हणाले, “मुंबईच्या पावसाची आपण अजिबात चिंता करू नका. बिहारच्या पुराशिवाय आपण जे राज्याला डुबवलं आहे, येत्या निवडणुकीत जनता आपल्याला नक्कीच डुबवल्याशिवाय राहणार नाही”

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसशासित महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरू असून महाराष्ट्र कोरोनाचा हॉटस्पॉट बनलं आहे. तर दुसरीकडे मुंबई पावसाच्या पाण्याने डूबते आहे, अशा शब्दात सुशील कुमार मोदी यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली होती.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

….अन्यथा 10 तारखेपासून आम्ही रस्त्यावर उतरणार, प्रकाश आंबेडकरांचा सरकारला इशारा

“कोरोनाचा प्रादुर्भाव डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये पसरतोय, तो रोखणं गरजेचे त्यासाठी…”

कोरोना रोखण्यात हलगर्जीपण नको, रूग्णांना…., उद्धव ठाकरेंचे महत्त्वाचे आदेश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या