महाराष्ट्र मुंबई विधानसभा निवडणूक 2019

“तीन अंकी नाटक असेल तर प्रेक्षक एकांकिका पाहणे पसंत करत नाहीत”

मुंबई | राज्यात महाशिवआघाडीचं सरकार येणार हे आता निश्चित झालं आहे. गुरूवारी तिन्ही पक्षांची संयुक्त बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद देखील घेतली. आता विरोधात लढलेले पक्ष भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्रित येत आहेत. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट करून भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

तीन अंकी नाटक असेल तर प्रेक्षक एकांकिका पाहणे पसंत करत नाहीत बरं..!, असं ट्वीट करत त्यांनी भाजपला टोला लगावला आहे. शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्रित येऊन त्यांच्या सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

कोणत्याही परिस्थितीत भाजप सत्तेपासून दूर राहिली पाहिजे, यासाठीच किमान समान कार्यक्रमावर आधारित या तिन्ही पक्षांनी एकत्रित येण्याचं ठरवलं आहे. दुसरीकडे मात्र राज्याला भाजपशिवाय स्थिर सरकार देणं शक्य नसल्याचं भाजपचं म्हणणं आहे.

दरम्यान, सचिन सावंत यांच्या ट्वीटला भाजप काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

काँग्रेस शिवसेनेचं नातं किती जुनं आहे ते पाहा…!

 

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या