बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“इतना सन्नाटा क्यूँ है भाई?, सुशांतप्रकरणी सीबीआय महिनाभरापासून गप्प का?”

मुंबई | एक महिना लोटला तरी सीबीआयकडून काहीच हालचाल झालेली नाही. कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आले नाही. यावर, इतना सन्नाटा क्यूँ है भाई?, असा सवाल काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच निवडणुका होईपर्यंत काही हालचाल करु नका, असे आदेश सीबीआयला दिले आहेत का?, अशी टीका सचिन सावंत यांनी केली.

सुशांत सिंहच्या मृत्यूचे गलिच्छ राजकारण करत मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे हे षडयंत्र होते. त्यासाठीच सीबीआयसह तीन केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय वापर केला हे आता सिद्ध झाले आहे. त्यांचा कुटील डाव त्यांच्यावर उलटल्याने सीबीआयला गप्प राहण्यास सांगितले असावं, असं सचिन सावंत यांनी म्हटलंय.

सुशांत प्रकरणात राजकारण केले जात असून आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम केले जात आहे हे आम्ही सुरुवातीपासून सांगत आलो आहोत, असंही सावंतांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘… तर मराठ्यांचे दुसरे सामाजिक पानिपत होईल’; शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा

एमआयएमच्या ‘त्या’ 2 आमदारांना अटक करा; अतुल भातखळकर यांची मागणी

“पासवान यांच्या मृत्यूमागे कट-कारस्थान, चिराग पासवान यांचं वर्तन संशयास्पद”

उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त; रूग्णालयातून सोडलं घरी

अकरावी प्रवेश प्रकरणी राज ठाकरे यांचा वर्षा गायकवाड यांना फोन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More