महाराष्ट्र मुंबई

“भाजपने अद्यापही सुशांत सिंहच्या आत्म्याला मुक्ती मिळू दिली नाही”

मुंबई | भाजपने अद्यापही सुशांत सिंहच्या आत्म्याला मुक्ती मिळू दिली नाही, अशी बोचरी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा भाजपने राजकीय पोळी भाजण्यासाठी उपयोग केला. याबाबत भारताची जनता भाजपाला माफ करणार नाही, असं सचिन सावंत यांनी म्हटलंय.

सीबीआय आता चिडीचूप का आहे? याचं उत्तर द्या, असं आव्हानही सचिन सावंत यांनी यांनी यावेळी दिलं. सुशांत सिंह राजपूत याच्या जन्मदिनी सचिन सावंत यांनी त्याला श्रद्धांजली अर्पण केली.

सुशांत सिंह राजपूत हा अत्यंत गुणी आणि होतकरू कलाकार होता. ज्या पद्धतीने त्याने या जगाचा निरोप घेतला ते अत्यंत दुर्देवाचे होते. पण भाजपने मात्र त्याच्या मृत्यूकडे राजकीय संधी म्हणून त्याचा फायदा उचलला, असं सावंत म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

सायरस पुनावालांची मोठी घोषणा; आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाखांची मदत जाहीर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार!

सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला लागलेली आग पुन्हा भडकली!

भंडारा जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी आरोग्य विभागाने केली ‘ही’ मोठी कारवाई!

“सीरमच्या इमारतीला आग लागली की लावली?, या घटनेची चौकशी झाली पाहिजे”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या