बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…अन् भाजपचं तोंड काळं झालं’; काँग्रेसची भाजपवर बोचरी टीका

मुंबई | सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात एम्स रुग्णालयाचा अहवाल आल्याने भाजपचं तोंड काळं झालं, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर केली आहे.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचं राजकारण करण्याचं भाजपचं षडयंत्रही बाहेर आलं आहे, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात एम्स रुग्णालयाने जो अहवाल दिला आहे त्यावरुन हे स्पष्ट झालं आहे की त्याच्या शरीरात विषाचा कोणताही अंश नव्हता. या अहवालावरुनच हे सिद्ध झालं आहे की याप्रकरणी भाजपने किती हीन दर्जाचं राजकारण केलं, असं सचिन सावंत म्हणालेत.

 

महत्वाच्या बातम्या-

मुंबईत ऑक्टोबरपर्यंत ट्रेन सुरु होण्याचे आदित्य ठाकरेंनी दिले संकेत!

“अमेरिका-युरोपप्रमाणे गांजाला कायदेशीर मान्यता द्यावी”

दोन वेगवेगळ्या पक्षांचे बडे नेते भेटतात, तेव्हा…- चंद्रकांत पाटील

मुंबईत आणखी एका अभिनेत्याचा मृत्यू, हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More