महाराष्ट्र मुंबई

“भाजपने राजकारणासाठी देवालाही सोडलं नाही”

मुंबई | भाजपने राजकारणासाठी देवालाही सोडलं नाही. त्यांनी देवालासुद्धा राजकारणाच्या आखाड्यात ओढलं, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर केली.

भाजपच्या मनात देवाविषयी भक्तीभाव नाही. मात्र, राजकारणाच्या आखाड्यात देवाला ओढण्याचा प्रयत्न भाजप नेहमीच करत राहीला आहे, असं सावंत म्हणाले.

राज्यातील सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं सुरु झाली आहेत. ठाकरे सरकारच्या या निर्णयाचे काहींनी स्वागत केले. तर मुख्यमंत्र्यांना हे उशिराने सुचलेलं शहाणपण आहे, असं म्हणत विरोधकांनी सरकारवर टीका केली. याला सचिन सावंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

राज्यात बार आणि रेस्टॉरंट सुरू होतात, मग मंदिरं उघडण्याचा निर्णय का नाही, असा सवालही विरोधकांकडून उपस्थित केला जात होता.

महत्वाच्या बातम्या-

भाऊबीजेला माझ्या सर्व भावांना ‘हे’ एकच मागणं आहे- अमृता फडणवीस

“मी सुद्धा वाढीव वीजबिलाची शिकार, दुतोंडी सरकारने आश्वासन पूर्ण करावं”

लुटारूंची संगत सोडली तर राजू शेट्टींना पुन्हा खांद्यावर घेईन- सदाभाऊ खोत

नितीश कुमार यांनी सातव्यांदा घेतली बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ!

“राष्ट्रवादीने एकनाथ खडसेंना डोक्यावर चढवलंय”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या