बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केंद्राच्या असंवेदनशील अवस्थेमुळे स्थलांतरित मजुरांची दैन्यावस्था; काँग्रेसची टीका

मुंबई |  औरंगाबादच्या दुर्घटनेला काँग्रेसने केंद्र सरकारला जबाबदार धरलं आहे. स्थलांतरित मजुरांच्या दैन्यावस्थेला केंद्र सरकारचा लहरी, मनमानी आणि असंवेदनशील कारभार जबाबदार आहे, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

करोनाची चाहूल लागताच नियोजन करुन या संकटाचा सामना करणे आवश्यक असताना आधी झोपा काढल्या आणि नंतर संकटाने गंभीर रुप धारण केल्यानंतर अचानक लॉकडाउन जाहीर केला. परिणामी देशाच्या विविध भागात लाखो स्थलांतरीत मजूर, कामगार अडकून पडले. लॉकडाउनच्या निर्णयानंतर दिल्ली व आता सूरतमध्ये रस्त्यावर चालणारे मजूर केंद्र सरकारच्या अपयशावर शिक्कामोर्तब करत आहेत, असं सचिन सावंत म्हणाले.

16 मजुरांच्या मृत्यूसंदर्भात केंद्रीय मानवाधिकार आयोगाने राज्य सरकारला नोटीस काढली ती खऱ्या अर्थाने केंद्र सरकारला देण्याची आवश्यकता आहे, असं म्हणत महाराष्ट्र सरकारने त्यांना अन्नधान्य, औषधे तसंच गरजेच्या वस्तूंची मदत केली. परंतू हाताला काम नसल्यामुळे त्यांना गावी जाण्याची ओढ लागलेली आहे. त्यासाठी ठोस योजना आखून केंद्र सरकारने राज्य सरकारांबरोबर काम करणे गरजेचे असल्याचं सावंत म्हणाले.

अचानक लॉकडाउन जाहीर केल्यामुळे लाखोंच्या संख्येने स्थलांतरीत मजूर विविध राज्यात अडकून पडले आहेत. केंद्र सरकारने आता गांभीर्याने पावलं उचलण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

दुकानं तसंच बांधकाम व्यवसाय सुरू करा; तज्ज्ञांच्या समितीचा अजित पवारांकडे अहवाल सुपूर्द

…पण अर्थव्यवस्था देखील पहावी लागेल, लॉकडाऊनवर गडकरींचं रोखठोक मत

महत्वाच्या बातम्या-

माझी प्रकृती ठणठणीत आहे, मला कोणताही आजार नाही- अमित शहा

“राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतीये, अन् 3 पक्षांचं सरकार कुरघोडीच्या राजकारणात व्यस्त”

राज्यातला कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजार पार… मात्र दिलासादायक बाब म्हणजे 3800 बरे होऊन घरी!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More