बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दाऊद आतापर्यंत 6 वेळा मरून जिवंत झालाय, मोदी सरकारने काय ते एकदाच सांगावं”

मुंबई | कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या दोन दिवसांपासून प्रसार माध्यमातून येत आहेत. केंद्र सरकारने यावर मौन बाळगले आहे. त्यामुळे संशयाचे वातावरण तयार झाले आहे. दाऊदचा खरंच मृत्यू झाला की तो जिवंत आहे हे केंद्र सरकारने एकदाचं ठरवून देशाच्या जनतेला सांगावे, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

दाऊदला कोरोनाची लागण झाल्यानंतर पाकिस्तानच्या कराची येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याच्या बातम्या हिंदुस्थानी प्रिंट तसेच टीव्ही माध्यमातून येत असून यातील सत्य काय आहे याचा खुलासा केंद्र सरकारने करण्याची आवश्यकता आहे, असं सावंत म्हणाले.

दाऊद हा हिंदुस्थानचा शत्रु असून तो भारतासाठी मोस्ट वॉटेंड आहे. पण 2014 पासूनच दाऊदच्या मृत्यूच्या बातम्या पसरवण्याचे अनेक योगायोग झाले असून आतापर्यंत सहावेळा दाऊद मरुन जिवंत झाला आहे, असा टोला सावंत यांनी लगावला.

मोदी सत्तेवर येताच आता दाऊदची खैर नाही, मोदींच्या नेतृत्वामुळे पाकिस्तान भयभीत झाला असून दाऊदही प्रचंड घाबरला आहे, मोदी पुन्हा सत्तेत आल्यानंतर प्रचंड घाबरलेल्या दाऊदने आयएसआयकडे संरक्षण वाढवून देण्यासाठी फोन केला, अशा बातम्या आल्या होत्या. आश्चर्य म्हणजे या चॅनेल्सची सूत्रे साक्षात आयएसआयपर्यंत पोहोचली आहेत असे ते स्वत:च म्हणतात. मोदी सरकारने संसदेला दिलेल्या उत्तरात दाऊदचा ठावठिकाणा माहीत नाही, असे सांगितले होते. म्हणून या वाहिन्यांच्या प्रमुखांना ‘रॉ’चे एजंट केले तर देशाला फायदा होईल, असा टोला सावंत यांनी लगावला.

ट्रेंडिंग बातम्या-

भारतातील ‘हे’ शहर बनतंय नवं वुहान; मृत्यूदराची आकडेवारी धडकी भरवणारी

मद्यप्रेमींसाठी गुडन्यूज… १० जूनपासून दारू होणार स्वस्त…

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरुच, आता चीनलाही टाकलं मागं

“मतदारांचा विश्वासघात करणाऱ्या आमदारांना जनतेने चपलीने मारायला हवं”

गृहमंत्री अनिल देशमुखांकडून सोनू सूदचं कौतुक, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More