बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाराष्ट्राचं आर्थिक महत्त्व कमी करणारे मोदी कुठं आणि महाराष्ट्राचं महत्त्व जाणणारे राहुल गांधी कुठं”

मुंबई |   काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज देशभरातील पत्रकारांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्राचं महत्त्व विषद केलं. तसंच महाराष्ट्राचं मोठेपण सांगितलं. हाच धागा पकडून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.

महाराष्ट्राचे आर्थिक महत्त्व कमी करून गुजरातला प्रकल्प नेणारे मोदीजी कुठं अन् दुसरीकडे महाराष्ट्राचे महत्त्व जाणणारे राहुल गांधी कुठं? असं म्हणत सचिन सावंत यांनी नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. तसंच महाराष्ट्राचं आर्थिक सेवा केंद्र गुजरातला गेल्याचं दु:ख काँग्रेसच्या मनात असल्याचं सांगितलं आहे.

मुंबई आणि महाराष्ट्राचं महत्त्व विषद करताना राहुल गांधी म्हणाले, “महाराष्ट्र हे खूप मोठं राज्य आहे आणि नुसतंच मोठं राज्य नाही तर ते एकामेवाद्वितीय राज्य आहे. महाराष्ट्र हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला निश्तित मदत केली पाहिजे तसंच इतर राज्यांना देखील मदत केली पाहिजे”.

राहुल गांधी यांनी आजच्या पत्रकार परिषदेत खूप महत्त्वाचे मुद्दे मांडले. तसंच सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजवर पुनर्विचार करण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. कोरोनाच्या लढाईत राज्ये ही महत्त्वाचा भाग आहेत. केंद्राचं मॅनेजमेंटचं काम आहे परंतू राज्यांचं ऑपरेशनचं काम आहे. म्हणून केंद्र जेवढी राज्याला मदत करेल तेवढी कोरोनाविरोधातली लढाई राज्य अधिक नेटाने लढतील, असंही राहुल गांधींनी यावेळी म्हटलं.

ट्रेंडिंग बातम्या-

10वी पास तरुणांना रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; परीक्षेशिवाय 561 जागा भरणार

मजुरांसाठी प्रियंका गांधी करणार बसची सोय; सरकारकडे मागितली परवानगी

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू, केंद्राची मदत मिळालीच पाहिजे- राहुल गांधी

पंढरपूर पालखी सोहळ्याबाबत आमदार रोहित पवारांनी दिला ‘हा’ सल्ला

पुण्यात दिवसेंदिवस वाढती रूग्णसंख्या; महापौरांनी केली अजित पवारांकडे ‘ही’ महत्त्वाची मागणी

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More