महाराष्ट्र मुंबई

“मनसेने आतापर्यंत कितीवेळा भूमिका बदलली आहे, हे राज ठाकरेंनाही सांगता येणार नाही”

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे मार्च महिन्यात अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे हे कोणत्याही एका गोष्टीवर ठाम नसतात. त्यांच्या भूमिका सतत बदलत राहतात, अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे.

आतापर्यंत मनसेने नेमकी कितीवेळा भूमिका बदलली आहे, हे राज ठाकरे यांनाही सांगता येणार नाही, असा टोला सचिन सावंत यांनी लगावला आहे. मनसेच्या भूमिकेत वारंवार बदल होतच राहतात. त्यामुळे राज ठाकरे यांचं एक ठाम असं काही नसतं, असे सचिन सावंत यांनी म्हटलंय.

दरम्यान, मनसेची मुंबईत वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

थोडक्यात बातम्या-

“…म्हणून बीएमसीतल्या विरप्पन गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल”

धक्कादायक! गावाला येत नसल्याने पतीने पत्नीची गळा चिरुन केली हत्या

…त्यासाठी राज ठाकरेंना आम्ही नक्की मार्गदर्शन करू- संजय राऊत

“आपल्या अहंकारासाठी केंद्र सरकार अजून किती शेतकऱ्यांचा बळी घेणार?”

सिंघू बॉर्डरवर स्थानिक-शेतकऱ्यांमध्ये दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या