बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“‘त्या’ सेलिब्रिटींनी आता शेतकऱ्यांच्या कौतुकाचे ट्विट करावे”

मुंबई | केंद्र सरकारने आणलेले तीन कृषी कायदे रद्द व्हावेत यासाठी शेतकऱ्यांनी जवळपास वर्षभर आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं आणि केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर वेगवेगळ्या स्तरांवरून प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली. तर शेतकरी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांना सौहार्दतेचे सल्ले देणारे सेलिब्रिटी कुठे आहेत, असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी लगावला आहे.

सचिन सावंत यांनी शेतकरी आंदोलना दरम्यानचे काही सेलिब्रिटींचे ट्विट शेअर केले आहेत. तर सेलिब्रिटींच्या इच्छेनूसार आता मैत्रीपूर्ण उपाय सापडला आहे. तर त्या सेलिब्रिटींनी आता शेतकऱ्यांनी त्यांच्या न्यायासाठी केलेल्या निर्विवाद लढ्याचे कौतुक करणारे ट्विट करावेत, असा टोला सचिन सावंत यांनी लगावला आहे. सावंत यांनी अक्षय कुमार, लता मंगेशकर, विराट कोहली, सुरेश रैना, अनिल कुंबळी, सायना नेहवाल या सेलिब्रिटींचे शेतकरी आंदोलनादरम्यानचे ट्विट शेअर केले आहेत.

शेतकरी आंदोलनादरम्यान अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी शेतकऱ्यांना शांततेचा आणि सौहार्दतेचा सल्ला दिला होता. तर या सेलिब्रिटींच्या ट्विटमध्ये ‘अॅमिकेबल’ म्हणजे सौहार्दता हा एक शब्द सारखा होता. तर ट्विटमधून एकसारखा सल्ला आणि अॅमिकेबल शब्दाच्या उल्लेखामुळे हे सेलिब्रिटी तेव्हाही ट्रोल झाले होते. तर मोदी सरकारने आता कृषी कायदे मागे घेतल्याने हेच सेलिब्रिटी आता सचिन सावंत यांच्या निशाण्यावर आले आहेत.

भाजपने या सेलिब्रिटींना पूर्वीप्रमाणे ट्विट लिहून द्यावे, असा खोचक टोला सचिन सावंत यांनी लगावला आहे. तर आता या सेलिब्रिटींनी शेतकऱ्यांच्या निर्विवाद लढ्याचे कौतुक करणारे ट्विट करावेत, अशी अपेक्षा आहे. तर या ट्विटमध्ये त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना टॅग केलं तरी आमची काही हरकत नसल्याचा घणाघातही सचिन सावंत यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

Netflix वापरताना मोबाईल डेटा संपतोय? ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करा आणि मोबाईल डेटा वाचवा

“आता निवडणुकांमध्ये पराभव स्पष्ट दिसू लागल्याने कृषी कायदे मागे घेतले”

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत काही प्रमाणात घट, पण धोका अदयाप टळलेला नाही

एसटी महामंडळाचा आक्रमक पवित्रा, तब्बल एवढ्या कर्मचाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता

नवाब मलिक म्हणतात, ‘मी दुबईला जात आहे, माझ्यावर नीट लक्ष ठेवा’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More