Top News

‘…तोपर्यंत आम्ही एकत्र’; ‘या’ काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य

मुंबई | शिवसेना आणि आम्ही एका विशिष्ट परिस्थितीत एकत्र आलेलो आहोत. आमच्यात यात शंका नाही. प्रत्येकाला पक्ष वाढवावा वाटत असेल तर तेही साहजिक आहे, असं काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी म्हटलंय.

सर्वजण आपली ताकद वाढावी, यासाठी प्रयत्न करणार, त्यामध्ये काही गैर नाही. भाजपाचे लोकशाहीवर जे गंडांतर आलेलं आहे, ते दूर होत नाही तोपर्यंत आम्ही एकत्रितपणे राहणार आहोत, असंही सचिन सावंत यांनी म्हटलंय.

तीन पक्ष मिळून एकत्रितपणे सरकार चालवू. त्यासाठी किमान समान कार्यक्रम तयार केलायय त्यावर पूर्ण पाच वर्षे हे सरकार चालेल, असं सचिन सावंत म्हणालेत.

मागील सरकारने मराठा आरक्षणाच्या मुद्यावर विरोधकांना कधीच विश्वासात घेतले नाही. पण महाविकास आघाडी सरकारने सर्वांना सोबत घेऊन आरक्षणाच्या मुद्यावर काम केले आहे. हे पाहून भाजपच्या नेत्यामध्ये पोटदुखी दिसून येत आहे, असं म्हणत सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधलाय.

महत्वाच्या बातम्या-

“आघाडी सरकार म्‍हणजे फेव्‍हीकॉलचा जोड, कधीही काहीही होऊ शकतं”

“चला घेऊ छत्रपतींचा आशिर्वाद म्हणणारे सत्तेत आल्यावर छत्रपतींना विसरले”

दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी घेतला हा महत्वाचा निर्णय

“शिवसेनेचा भगवा फडकेल पण तो पकडायला उद्धव ठाकरे एकटेच उरतील”

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या