महाराष्ट्र मुंबई

‘साधूंचे मारेकरी, भाजपचे पदाधिकारी’ म्हणत काॅंग्रेसने ट्विटरवर सादर केला पुरावा

मुंबई | लॉकडाऊन कालावधीत पालघरच्या गंडचिंचले गावात एका अफवेवरुन तीन जणांची सामूहिक हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. आतापर्यंत 101 आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणातील आरोपी हे भाजपचेच पदाधिकारी असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

सचिन सावंत यांनी ट्विट करत या साधूंचे मारेकरी भाजपचे पदाधिकारी असल्याचं म्हटलंय. तसेच त्यांनी यासंबंधित काही पुरावे सादर केले आहेत. साधुंच्या लिंचिंगचे आरोपी क्र. 61 ईश्वर निकुले आणि 65 भाऊ साठे हे भाजपचे पदाधिकारी आहेत, असा दावा सचिन सावंत यांनी केला आहे.

आरोपींच्या यादीत आणखी बरेच भाजप कार्यकर्ते आहेत. तसेच अटक झालेल्यांच्या यादीत भाजपच्या बूथ प्रमुखांचीही नावे असल्याचं सचिन सावंत यांनी म्हटलंय.

दरम्यान, साधूंच्या हत्येत सहभागी असलेल्या त्यांच्या पक्षाच्या सदस्यांवर भाजपकडून कारवाई का केली जात नाही?, असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे.

 

 

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

गेहलोत सरकारचा मोठा निर्णय; 5 कोटी लोकांना वाटणार मोफत गहू

अवकाळी पावसाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना शासनाचा दिलासा; दिले पंचनामे करण्याचे आदेश

महत्वाच्या बातम्या-

“दारुच्या पैशातून मिळणारा महसूल महिलांचा शाप; राज्य सरकारने तो स्वीकारु नये”

गरीब मजुरांच्या खात्यात तातडीने 7500 रुपये भरा- सोनिया गांधी

महसूल मिळावा म्हणून वाईन शाॅप सुरु करा- राज ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या