Top News महाराष्ट्र मुंबई

“छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज केवळ हिंदूंचे राजे नव्हते ते अठरापगड जातींचे राजे होते”

मुंबई | औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याला आमचा विरोध असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. त्यामुळे महाविकास आघाडीतील धुसफुस बाहेर असल्याचं भाजप म्हणत आहे. अशातच काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सांवंत यांनी आपल्या पक्षाची बाजु मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज केवळ हिंदूंचे राजे नव्हते ते अठरापगड जातींचे राजे असल्याचं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

ज्या विचारांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला संभाजी महाराजांनाही त्यांनी विरोधच केला. त्याकाळी जातीविरहीत धर्मनिरपेक्ष राज्य या महापुरुषांनी, आमच्या दैवतांनी स्थापन केलं, असं सांवत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी आपल्या मुलांचे शहाजी आणि शरीफजी ठेवले होते. ते तत्कालीन सुफी संत शाह शरीफजी यांच्या वरील श्रध्देने ठेवलं असल्याचं सांवतांनी सांगितलं.

 

थोडक्यात बातम्या-

रोहित शर्माची एक चूक आणि भारताचे 5 खेळाडू आयसोलेशनमध्ये

“औरंगाबादचे नामांतर महाविकासआघाडी सरकारच्या कॉमन मिनिमम प्रोगामचा भाग नाही, आमचा कायम विरोधच”

लेडी PSI ची आत्महत्या; पत्रात लिहिलं ‘हे’ कारण!

“भाजपची लस घेऊ शकत नाही, त्यांच्या लसीवर मी कसा काय विश्वास ठेवू”

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना जीवे मारण्याची धमकी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या