बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“परमबीर सिंह यांना वाचवणं भाजपसाठी गरजेचं आहे”

मुंबई | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी धक्कादायक आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी निलंबित अधिकारी सचिन वाझेला महिन्याला 100 कोटी वसुल करायला लावले होते, असा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. या प्रकरणावरून परमबीर सिंह यांना एनआयएने समन्स बजावलं होतं आणि चौकशीसाठी बोलावलं होतं मात्र ते हजर राहिले नाहीत. परमबीर सिंह भारताबाहेर पळून गेल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे.

जर परमबीर सिंह भारत सोडून पळून गेले हे सत्य असेल तर देशाबाहेर जाण्यासाठी त्यांना सुरक्षित मार्ग देण्यात भाजपची निश्चित भूमिका असणार आहे. परमबीर सिंहना वाचवणं भाजपसाठी गरजेचं आहे. सर्वात आधी एनाआयएने अँटिलिना प्रकरणाची चौकशी सुरू केली होती, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

एनआयएच्या आरोपपत्रात स्पष्टपणे म्हटले आहे की वाझे परमबीरना रिपोर्ट करत होता. परमबीर यांनी जैश उल हिंद या अतिरेकी संघटनेवर अँटिलिया प्रकरणाची जबाबदारी ढकलण्यासाठी सायबर तज्ञाला 5 लाख दिले. तरीही परमबीर पळून गेले तर ते एनआयएचं अपयश असल्याचं सावंत म्हणाले.

दरम्यान, चौकीदार सरकार काय करत होते?, नीरव मोदी, चोक्सी, मल्ल्या आणि परमबीर सारखे लोक जेव्हा देश सोडून पळून जातात तेव्हा चौकीदार सरकार सातत्याने झोपलेले का आढळते?, हे झोपेचे सोंग उघड होऊन जनतेसमोर सत्य आल्याशिवाय राहणार नाही, असं सावंत यांनी सांगितलं.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

“रस्ते बांधणं म्हणजे ‘रॉकेट सायन्स’ नाही, ठाकरे सरकार सत्तेत आहे तोपर्यंत…”

”नाना पटोले काहीही बोलतात, नाना असे व्यक्ती आहेत जे…”

“मी शेतकऱ्यांच्या बांधावर होतो, त्यावेळी पंकजा मुंडे अमेरिकेत…”

एअर इंडियाच्या बोलीवर टाटा समुहाची मोहर; तब्बल 68 वर्षानंतर पुन्हा मिळवली मालकी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More