बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“काँग्रेसच्या मंत्र्यांवर आरोप करायचे असतील तर…”; काँग्रेसचं पाटलांना प्रत्युत्तर!

मुंबई | राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस पक्षाच्या नेेत्यांवर भाजप नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. या टीकेला काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पाटलांवर निशाणा साधला आहे.

काँग्रेस नेत्यांचे भ्रष्टाचार काढणार या नवीन भविष्यवाणीआधी, 72 तासात “माजी”चे “आजी” मंत्री होणार या चंद्रकांत पाटलांच्या भविष्यवाणीचं काय झालं?, देशात आज कुठेच कोणाचा शपथविधी झालेला दिसत नाही. आम्ही दादांना शुभेच्छा कशा द्याव्यात?, कोविडमुळे राज्यात तसेही नाटक सिनेमा बंद आहेत, अशी उपरोधिक टीका सचिन सावंत यांनी केली आहे.

सोमय्या आणि पाटील यांचे हे फुकटचे मनोरंजन म्हणून जनता पाहत आहे. ईडी, सीबीआयने सोमय्यांना फ्रेंचायझी दिली का?, तक्रारी करायच्या तर करा पण चौकशीचं काम ही भाजपचं करणार का?, काँग्रेसच्या मंत्र्यांवर आरोप करायचे असतील तर फुसक्या लवंग्या नको दमदार करा! नौटंकीला जशास तसे उत्तर देऊ, असंही सावंत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सचिन सावंत यांंनी केलेल्या टीकेवर चंद्रकांत पाटील काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

‘या’ 12 राज्यांनी देशाचं टेंशन वाढवलं; कोरोना रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ

बाप बापच असतो… बिबट्याच्या जबड्यातून केली मुलाची सुटका

“ज्याच्या घराला कधी छत नव्हतं, त्याला आज काॅंग्रेसने मुख्यमंत्री बनवलंय”

सासू सासऱ्यांना आला सूनेवर संशय, नात्वाचा जन्म होताच केली DNA टेस्ट अन्…

देवेंद्र फडणवीस दबंग नेते, ते 100 अजित पवार खिशात घेऊन फिरतात- चंद्रकांत पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More