Top News महाराष्ट्र मुंबई

“कंगणा राणावतने भाजपला खुश करण्यासाठी महाराष्ट्राची बदनामी केली”

मुंबई | कंगणा राणावत आणि उर्मिला मातोंडकर यांच्यात झालेल्य वादात कंगणाने मातोंडकरांवर टीका करताना केलेलं ट्विटवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेत्यांनी कंगणावर निशाा साधला आहे.

‘सच मे भाजपा को खुश करके’  तिने वापरलेल्या या शब्दांमधून तिने आत्तापर्यंत ट्विट करत भाजपला खुश करण्यासाठी महाराष्ट्राची बदनामी केली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

कंगणा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान करत होती तेव्हा भाजपचे नेते खुश होते. भाजप नेते राम कदम यांनी कंगणाला झाशीची राणी असं म्हटलं होतं. यातूनच त्यांचा महाराष्ट्रद्रोह स्पष्ट होत असल्याचं सचिन सावंत म्हणाले. सावंतांआधी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनीही कंगणावरून भाजपवर निशाणा साधला.

दरम्यान, भाजपला खूश करण्यासाठीच महाराष्ट्राची बदनामी केल्याची कबुली देऊन महाराष्ट्रद्रोही असणाऱ्या महाराष्ट्रातील भाजपचा मुखवटा टरकावत खरा चेहरा पुढं आणल्याबद्दल कंगणाचं अभिनंदनच करायला पाहिजे, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

कंगणाचं ट्विट-

 

थोडक्यात बातम्या-

DYSP पैलवान राहुल आवारेने आपले गुरू काका पवारांच्या लेकीला बनवलं जीवनसाथी

काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचाही औरंगाबादच्या नामांतरला विरोध!

“राजकारणात येण्यासाठी दबाव टाकल्याने सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका”

“भाजपने नाक घासून महाराष्ट्राची माफी मागितली तरी ‘या’ पापातून मुक्ती मिळणार नाही”

‘विदर्भवासियांनो मी तुम्हाला वचन देतो की…’; मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या