बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“प्रियांका, कंगणाला भेटणाऱ्या मोदींनी संभाजीराजेंना वेळ न देणे हा महाराष्ट्राचा अवमान”

मुंबई | मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकारण तापलेलं आहे. मराठा समाजातील प्रमुखांची आरक्षणाविषयीची भूमिका जाणून घेण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे हे राज्य दौऱ्यावर आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटणार असेल तर मी आताच खासदारकीचा राजीनामा देतो, असं संभाजीराजे भोसले यांनी म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मराठा आरक्षणावरून पंतप्रधान नरेेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि कंगणा राणावत या बॉलिवूड तारकांना पंतप्रधान मोदी भेट देतात. मात्र अनेकदा विनंती करूनही संभाजीराजे छत्रपती यांना मोदींनी भेट दिली नाही. हा महाराष्ट्राचा अवमान असल्याचं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. मुंबईत ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते

नरेंद्र मोदी आणि भाजपला छत्रपतींची आठवण केवळ निवडणुकीच्या वेळीच येते का, असा सवालही सावंत यांनी केला आहे. मराठा आरक्षण प्रश्नावर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चारवेळा भेटण्याची वेळ मागितली. परंतु आजपर्यंत मोदींनी त्यांना वेळच दिली नाही. चित्रपट अभिनेत्री प्रियांका चोप्रा, कंगना राणावत आणि इतर बॉलिवूड अभिनेत्यांना भेट देत असल्याचं म्हणत सावंत यांनी मोदींवर टीका केली.

दरम्यान, सर्व तारकांचे कोणते गहन प्रश्न होते त्यांना मोदींनी वेळ दिला आणि मराठा आरक्षणाकरिता भेट मागणाऱ्या छत्रपती संभाजीराजेंना भेटायला त्यांच्याकडे वेळ नाही. संभाजीराजेंना भेट न देणं हा महाराष्ट्राचा अवमान आहे, असं सावंत यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

पुणे हादरलं! फुरसुंगीत कॅनॉलमध्ये एकामागोमाग एक मृतदेह आले वाहत

“बाबा माझे कपडे फाटलेत…”,बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी दीड वर्षांनंतर परिवाराला भेटली

“भाजपने ॲापरेशन लोटसचा कधीच दावा केला नाही, तरी एवढी धास्ती का?”

12 नावांची यादी खरंच भूतांनी पळवली?, राज्यपाल कार्यालयाचं तात्काळ स्पष्टीकरण

हर एक फ्रेंन्ड कमीना होता है! लग्नात मित्रांनी असं गिफ्ट दिलं की; ते पाहून तुम्हीही व्हाल चकीत, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More