बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजप आणि आरएसएसने श्रीरामांच्या नावावर वर्गणी गोळा करण्याचा धंदा चालवलाय”

मुंबई | अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून यावरून विरोधी पक्षांनी भाजपवर टीकेची झोड उडवली आहे. अयोध्येतील राम मंदिरासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने जमीन खरेदी करताना घोटाळा झाल्याचा आरोप आपचे खासदार संजय सिंह आणि समाजवादी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर आणि आरएसएसवर निशाणा साधला आहे.

दोन कोटी रुपयाची जमीन अवघ्या काही मिनिटांतच 18.5 कोटींची कशी झाली?, भाजप आणि संघानं मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या नावावर सर्व मर्यादा सोडून चंदा गोळा करण्याचा धंदा चालवलेला आहे, असं सचिन सावंत यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

अयोध्येत राम मंदिर व्हावं ही सर्वांची इच्छा आहे. मात्र रामाच्या नावावर चाललेला हा बाजार लांछनास्पद आहे. हा प्रकार रामभक्तांचा अपमान करणारा असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणीही सावंत यांनी केली आहे.

दरम्यान, संघ परिवाराने राम मंदिरासाठी याआधीही निधी गोळा केला होता. त्या निधीचं काय झालं?, याची माहिती अद्याप त्यांनी दिलेली नाही. राम मंदिरासाठी गेली अनेक वर्षे लढणाऱ्या निर्मोही आखाड्याने विश्व हिंदू परिषदेवर मंदिरासाठी जमा केलेले 1400 कोटी रुपये लुबाडल्याचा आरोप केला असल्याचं सावंत यांनी केला आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

निलेश राणे आणि संजय काकडेंनी तब्बल इतक्या लाखांची पाणीपट्टी थकवली, पुणे महापालिकेने धाडली नोटीस

आनंदाची बातमी! अखेर पुण्यातील त्या चिमुरडीला 16 कोटीचं इंजेक्शन आज मिळालं

‘छिपाना भी नही आता और दिखाना भा नही आता’, तमन्ना भाटीया ड्रेसवरुन झाली ट्रोल

‘केंद्र सरकारला फार काळ अल्पदरात लसी देता येणार नाहीत’; ‘या’ लस कंपनीचा केंद्राला इशारा

“उद्या लोकप्रतिनिधींना बोलुद्यात, आपण सर्वांनी मौन राखायचे” – छत्रपती संभाजीराजे

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More