बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विखे पाटलांनी राजीनामा दिल्यावर काँग्रेस आक्रमक; विखेंवर केला हल्लाबोल

मुंबई |  ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखेर हाताची साथ सोडत आपल्या काँग्रेस आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत चांगलेच आक्रमक झालेले आहेत.

पक्षाने प्रचंड दिल्यानंतरही पक्ष सोडणारे काही नेते आमदार फोडून पक्ष तोडण्याची भाषा करत आहेत. ही त्यांची मनोवृत्ती दर्शविते, अशा जहाल शब्दात सावंत यांनी विखेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

134 वर्षांची काँग्रेस पराभवाने संपणार नाही. पुन्हा नव्या उर्जेने, ताकदीने उभारी घेईल. गद्दारी केली तरी त्यांना शुभेच्छा… शेवटी काँग्रेस महात्मा गांधींची आहे… असं सावंत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, विखे पाटलांच्या राजीनाम्याने काँग्रेसमध्ये फुटीची शक्यता निर्माण झाल्याने काँग्रेसच्या गोटात चिंतेचं वातावरण असल्याचं बोललं जातं आहे.

महत्वाच्या बातम्या

-राष्ट्रवादीचे 10 आमदार आणि राज्यातील संपूर्ण काँग्रेसच माझ्या संपर्कात- प्रकाश आंबेडकर

-…म्हणून आगामी निवडणुकीत राज ठाकरे किंगमेकर बनू शकतात; प्रकाश आंबेडकरांचंं भाकित

-…म्हणून मला घाई-गडबडीत लग्न करावं लागलं; अमिताभ बच्चन यांचा खुलासा

-अखेर राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘हाताची साथ सोडली’; जाता जाता काँग्रेसचे टेन्शन वाढवणार

-काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार; हे विद्यमान आमदार भाजपच्या वाटेवर?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More