बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मूका मोर्चा म्हणणारे मराठा आरक्षणाच्या जल्लोषात सामिल कसे काय?”

मुंबई | मराठा समाज गेली अनेक वर्षांपासून देत असलेल्या लढ्याला यश आलं आहे. ‘एसईबीसी’ अंतर्गत हे आरक्षण न्यायालयाने वैध ठरवलं आहे. त्यानुसार शिक्षणात आणि नोकरीत 12 ते 13 टक्के आरक्षण लागू होणार आहे.

मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाचं विरोधी पक्षातल्या नेत्यांनीही स्वागत केलं आहे. मात्र याच मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी शिवसेनेवर टिकास्त्र सोडलंय.

‘मूका मोर्चा’ म्हणणारे आता या जल्लोषात सामिल कसे? असं ट्विट करत त्यांनी शिवसेनेला सवाल विचारला आहे.

दरम्यान, शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामना मधून ‘मूका मोर्चा’ अशी खिल्ली उडवणारं व्यंगचित्र प्रकाशित झालं होतं. याचा निषेध करत मराठा समाजाने सामनाच्या अंकांचं दहन केलं होतं. याबाबत खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मराठा समाजाची माफी मागावी लागली होती.

महत्वाच्या बातम्या-

-अमित शहांनी लोकसभेत मांडले ‘हे’ दाेन महत्वपूर्ण प्रस्ताव!

-मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबियांना 10 लाख अन् नोकरी कधी?? चंद्रकांत पाटील म्हणतात…

-जगभरात शमीचं कौतुक; मात्र बायको म्हणते याला लाजच नाही!

-म्हणून लोकसभेत काँग्रेसचा पराभव झाला; ज्येष्ठ नेत्याने दिला पक्षाला घरचा आहेर

-अमली पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतुद करा- अजित पवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More