पुणे महाराष्ट्र

हे गरुडा, सांग त्या इंद्राला तुझ्या सिंहासनाला धोका झालाय; ‘त्या’ गुंडाचे फलक लावणारे पोलिसांनी फटकावले!

पुणे | हे गरुडा… सांग त्या इंद्राला, तुझ्या सिंहासनाला आता धोका… तुम्हाला वाटेल हा कुठल्यातरी चित्रपटाचा डायलाॅग आहे, मात्र असं वाटत असेल तर तुम्ही चुकताय, कारण नुकतीच हत्या झालेल्या गोल्डनमॅन गुंड सचिन शिंदेबद्दल हा डायलाॅग त्याच्या समर्थकांकडून वापरण्यात आला आहे. सचिन शिंदेची हत्या झाल्यानंतर अनेकांच्या व्हाॅट्सअप स्टेटस तसेच फेसबुकवर हा डायलाॅग झळकला आहे. एवढंच काय तर गावागावात त्याच्या कौतुकाचे गोडवे गाणारे बॅनर लागले आहेत, मात्र अशा लोकांना पुणे ग्रामीण पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे.

खून, खुनाचा प्रयत्न, हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे सचिन शिंदेवर दाखल होते. टोळीयुद्धातून नुकतीच त्याची हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर या परिसरात त्याच्या श्रद्धांजलीचे फलक मोठ्या संख्येनं लावण्यात आले आहेत. ही कृती गुन्हेगारीला उत्तेजन देणारी असल्याने पुणे पोलिसांनी अशा लोकांना आपला खाक्या दाखवायला सुरुवात केली आहे. गुंडाच्या श्रद्धांजली बॅनर लावणारांना शिक्रापूर पोलिसांनी पोलीस स्टेशनला बोलवून घेतलं होतं, त्यांना चांगलाच प्रसाद देण्यात आला आहे. याशिवाय त्यांच्या सरकारी जागेचे विद्रुपीकरण करणे यासारखे गुन्हे दाखल केले असून त्यांना अटक करण्यासही सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी दिली आहे.

सचिन शिंदेनं पुणे-नगर रोडवर एका ग्रुपची स्थापना केली होती. या रस्त्यावरील वाघोली, लोणीकंद, कोरेगाव, पेरणे, वढू, सणसवाडी, चौफुला, करंदी, केंदूर, शिक्रापूर, आपटी, वाजेवाडी या भागातील शेकडो तरुण या संघटनेत सहभागी झालेले आहेत. यासारखे आणखी काही ग्रुप या भागात असून इंडस्ट्रीएल एरिया असल्याने कंपन्यांमध्ये काम घेण्यावरुन या ग्रुपमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरु असतं. यातून गुंडगिरी बळावली असून हत्या करणे हा या गटांसाठी किरकोळ विषय बनला आहे. असे गट मोडून काढण्यासाठी पोलिसांनी आता कंबर कसली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी पुणे नगर महामार्गावरील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुंडांचे उद्दात्तीकरण करणारांवर यापुढे पोलिसांची करडी नजर राहणार आहे. यासाठी पोलिसांच्या एका स्वतंत्र गटाची स्थापना करण्यात आली असून आता कुणाचीही खैर केली जाणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

“तेंडुलकर आणि लतादीदींच्या चौकशीचा प्रश्नच उद्भवत नाही, लता मंगेशकर आमचं दैवत”

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची वाढ; गेल्या 24 तासांत ‘इतक्या’ हजार रूग्णांची नोंद

…तेव्हा तर काही केलं नाही, आता ढुसण्या मारणं बंद करा- अजित पवार

‘पूजा चव्हणाची हत्या नाही तर…’; धनंजय मुंडेंचं पूजाच्या आत्महत्येबाबत मोठं वक्तव्य!

मला पण बघू दे शिवसेनेत कोण मर्द उरला आहे?- नितेश राणे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या