बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मास्टर ब्लास्टरसह लिटल मास्टरनं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट!

मुंबई | क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडूलकर आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू सुनिल गावसकर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. सचिननं उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी जाऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं.

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आज भारतरत्न, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर जी आणि महान क्रिकेटपटू, लिटिल मास्टर सुनील गावस्कर जी यांनी मातोश्री निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली, असं उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत सांगितलं आहे.

या बैठकीत कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नसून ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं आहे.  या भेट दरम्यान आमदार आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित होते.

दरम्यान, राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेचच एक-दोन दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं सांगितल जात होतं. मात्र मंत्रिमंडळात कुणाचा समावेश करायचा, याबाबत अजून काँग्रेसची चर्चा सुरू असल्यानं विस्तार लांबणीवर पडत असल्याचं समजतं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More