बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मिशन ऑक्सिजन’साठी क्रिकेटचा देव’ मदतीला धावला, केलं मोठं दान

मुंबई | कोरोनाने देशभरात हैदोस घातलेला आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. एकीकडे काळाप्रमाणे आव वासून बसलेला कोरोना आहेच मात्र आता ऑक्सिजनचा तुटवडा पडू लागल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यानंतर अनेकजण पुढाकार घेत मदत करताना दिसत आहेत. अशातच क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरनेही मदत केली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशातील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण केला आहे. कोरोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवणे ही सध्याच्या तासाची गरज बनली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढताना पाहून दुःख होत आहे. 250+ अधिक युवा उद्योजकांनी मिशन ऑक्सिजनची सुरूवात केली आहे. त्याच्या माध्यमातून ते निधी गोळा करून ऑक्सिजन खरेदी करणार आहेत आणि देशातील हॉस्पिटल्सना दान करणार आहेत, असं सचिनने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सचिननं त्याच्या पोस्टमध्ये किती मदत केलीय हे जाहीर केलं नसलं तरी इंग्रजी प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार त्यानं 1 कोटी दान केल्याची माहिती समजत आहे. याआधीआयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघातील परदेशी खेळाडू पॅट कमिन्सने आक्सिजनच्या पुरवठ्यासाठी पुढाकार घेत त्यानेही मदत केली आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा प्रमुख गोलंदाज असलेल्या पॅट कमिन्सने 50 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजे जवळपास 30 लाख रुपयांची मदत पीएम केअर फंडाला दान केले होते.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar)

थोडक्यात बातम्या- 

काय सांगता! पोलार्डने बॅटने नाही कर हेलमेटने मारला चौकार, पाहा व्हिडीओ

महाराष्ट्रातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढला; 15 मे पर्यंत अंमलबजावणी कायम

फुफ्फुसांव्यतिरिक्त ‘या’ अवयवांवर आक्रमण करतोय कोरोनाचा नवा स्ट्रेन, वेळीच व्हा सावध!

तिचं स्मशान होईल असं कधीच वाटलं नव्हतं…- हेमंत ढोमे

कोरोनातून बरे झालेल्यांनी लस घ्यावी की नाही?; तज्ज्ञांनी दिला हा मोलाचा सल्ला; म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More