Top News खेळ

दहा वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सचिननं घडवला होता सर्वोच्च इतिहास

Loading...

मुंबई | आजचा दिवस तमाम क्रिकेटप्रेमींसाठी खास आहे. कारण दहा वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरनं सर्वोच्च इतिहास घडवला होता. सचिन एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक करुन पृथ्वीतलावरील पहिला फलंदाज ठरला होता.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात १४७ चेंडूत २०० धावांची खेळी करत सचिनने हा विक्रम केला. तोपर्यंत कोणालाही साध्य न झालेला पराक्रम सचिन तेंडूलकरने करुन दाखवला होता. तमाम भारतीयांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.

सचिन १९८ वर नाबाद असताना तब्बल ५५ लाख लोकांनी एकाच वेळी ‘इसपीएन क्रीकइन्फो’ ह्या वेबसाईटवर लॉग इन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे ही वेबसाईट बंद पडली होती, असं क्रिडा विश्लेषक आदित्य गुंड सांगतात.

दरम्यान, सचिन तेंडुलकरनंतर अनेकांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतकाचा पल्ला पार केला आहे. पण अजूनही सचिननं झळकवलेलं द्विशतक क्रिकेटप्रेमींच्या स्मरणात आहे.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

नरेंद्र मोदी सत्तेत असेपर्यंत भारत-पाक सामना होणार नाही- शाहिद आफ्रीदी

भाजपच्या ‘या’ नेत्याचा जातीचा दाखला रद्द?; खासदारकी धोक्यात

महत्वाच्या बातम्या-

DJ च्या तालावर बापानं काढली 22 वर्षीय मुलाची अंतयात्रा!

‘या’ विभागांना 5 दिवसांचा आठवडा लागू नाही!

साबरमती आश्रमात ट्रम्प दाम्पत्यानी केली सूत कताई!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या